चार तरुणांकडून साधूला बेदम मारहाण,साधूचा मृत्यू ; तरुणांवर गुन्हा दाखल

0
283

 

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका साधूची बेदम मारहाण करत हत्या केली. साधूने दारू पिण्यासाठी तरुणांकडे पैसे मागितले होते. यावरून साधू आणि तरुणांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. चार तरुणांनी मिळून साधूला मारहाण केली.त्याच्या डोक्यात दगड घातला. साधूला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आणि आरोपींना ताब्यात घेतले. पप्पू असं हत्या झालेल्या साधूचे नाव होते.

पहा पोस्ट: