
जलसंपदा विभागाच्या आश्वासना नंतर आंदोलन स्थगित
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी मधील तलावाच्या भरावावर काटेरी झुडपांचे अतिक्रमण झाले असुन त्यामुळे तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शिवाय शेतीपंपाच्या वीजेच्या केबलचे धोकादायक जाळे वाढले आहे. याबाबत प्रशासनाच्या निषेधार्थ आटपाडी तलाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तीने पक्षाचे तालुकाध्यक्ष शुभम हाके, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासो मेटकरी पाण्यात जलआंदोलन केले. आंदोलनानंतर जाग आलेल्या जलसंपदा विभाने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने, आंदोलन स्थगित करण्यात आले.
आटपाडी तलावाच्या भरावावर आणि आतील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. पाणीपुरवठ्यासह शेतीपंपाचे शेकडो कनेक्शन येते आहेत. झुडपांमुळे तलावाचा भराव आणि परिसराची सुरक्षा थोक्यात आली आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीच्या केबल तुटलेल्या, त्यावरील आवरण नष्ट झालेले असुन या केबलद्वारे वीजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापुर्वी आटपाडी तलावात अशाच नादुरूस्त केबलमुळे दोन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. रात्री, अपरात्री शेतकरी तलावात पंप सुरू करण्यासाठी जातात. त्यांना शॉर्ट केबलमुळे जीवितास धोका निर्माण झाल्याची बाब शुभम हाके, बाळासो मेटकरी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
परंतु, निवेदन देवूनही कारवाई न केल्याने काल रासपचे शुभम हाके, बाळासो मेटकरी यांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरु केले. आंदोलन सुरु झाल्यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत लेखी आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलनाला रासप नेते लक्ष्मण सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, महेश पाटील यांनी भेट दिली.