
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील ५३ गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक २३ एप्रिल रोजी आटपाडी येथे संपन्न होणार असल्याची माहिती आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनु.जातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे ही सहा ग्रामपंचायत मध्ये राखीव असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे (ओबीसी) ही एकूण १४ ग्रामपंचायत मध्ये राखीव असणार आहेत. तर ३३ ग्रामपंचायत मध्ये खुला प्रवर्ग म्हणजे ओपन आरक्षण असणार आहेत.
सदर सरपंचपद आरक्षण सोडत ही आटपाडी येथे दिनांक २३ एप्रिल रोजी होणार असल्याने या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केले आहे.