गोमेवाडीच्या उपसरपंचपदी राणी सोहनी बिनविरोध निवड

0
575

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावाच्या उपसरपंचपदी सौ. राणी सतीश सोहनी यांची बिनाविरोध निवड झाली. निवडीनंतर राणी सोहनी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

गोमेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व वैभव पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. उपसरपंच पुजा अमोल जावीर यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया प्रशासनाने राबविली होती.
सरपंच मंगल काळे यांच्या प्रमुख उपस्थित उपसरपंच निवडीची प्रक्रिया संपन्न झाली. उपसरपंच पदासाठी सौ. राणी सतीश सोहनी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनाविरोध निवड झाली. निवडीनंतर सरपंच मंगल काळे यांनी नूतन उपसरपंच राणी सोहनी यांचा सत्कार केला.

 

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सदस्य वसंत सरगर, उत्तम काळे, दिपक मोटे, विश्रांती शरद आवळे, काजल विकास अर्जुन, पूजा अमोल जावीर यांच्यासह रावसाहेब काळे, अनिल अर्जुन, लक्ष्मण कदम, गिरीश झेंडे, अजय सोहनी, कुमार सोहनी, रोहित सोहनी, दिपक लवटे, रमाकांत सोहनी, अजय आवळे, समाधान सोहनी, विकास अर्जुन, विनायक अर्जुन उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here