
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सिद्धनाथ विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र दत्तू चव्हाण आणि व्हाईस चेअरमनपदी राम हरी बाबासो जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे नेते तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोषभाऊ पुजारी, दत्तात्रय पाटील, ए.आर. सौ. साधना शिंदे (मॅडम), ब्रम्हदेव व्हनमाने, अरविंद चव्हाण (चेअरमन), हणमंत पाटील, मनोज नांगरे-पाटील, तानाजी चव्हाण, रवीशेठ सातारकर, संचालक वर्ग व विविध मान्यवर उपस्थित होते.
या निवडीमुळे सोसायटीच्या भविष्यातील कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडून आलेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट रित्या पार पडले.