मुंबईत ‘पुष्पा’ला अटक! लाल चंदनाची रेल्वेतून चक्क……

0
100

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे पोलिसांच्या दक्षता पथकानं लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या रियल लाइफ ‘पुष्पा’ला अटक केली आहे. रेल्वेतून लाल चंदनाची तस्करी केली जात असल्याची टीप रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मुंबई सेंट्रल स्थानकात आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ९३ किलो लाल चंदन जप्त करण्यात आलं आहे.

 

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे लाल चंदन आरोपीनं आणलं कुठून? ते कुणाला विकलं जाणार होतं? याबद्दलची माहिती पोलीस घेत आहेत. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

आरोपी रेल्वेच्या मालडब्ब्यातून लाल चंदनाचे छोटे छोटे तुकडे करुन घेऊन प्रवास करत होता. पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी रंगेहात हाती लागला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चंदनाचं वजन केलं असता ते ९३ किलो इतकं भरलं आहे. याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.