पुणेकरांचा नादखुळा! ‘तुम्ही गाडी उचलली तरी मी उतरणार नाही’; थेट वाहतूक पोलिसांशी भिडला पठ्ठ्या, Video Viral

0
691

Viral Video : पुणे तिथे काय उणे म्हणतात ते उगाच नाही. पुण्यात कधी काय होईल आणि पुणेकर काय करतील याचा काही नेम नाही. पुणेकर हे नेहमी स्पष्टवक्तपणासाठी ओळखले जातात. किमान शब्दात कमाल अपमान करण्याचे हटके कौशल्य त्यांच्याकडे आहे त्यामुळे पुणेकरांच्या नादाला कोणी लागत नाही. कोणी पुणेकरांच्या नादाला लागले तर पुणेकर त्यांना पुणेरी शैलीत उत्तर देतात. पुणेकरांचे हे अतरंगी रुप दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. अशाच एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की वाहतूक पोलिसांनी एक गाडी उचलली आहे पण त्या गाडीवर एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. गाडी हवेत तरंगत असूनही तो व्यक्ती गाडीवर बसलेला आहे हे पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

 

 

 

पुण्यातील रस्ते छोटे आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने ण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे त्याचबरोबर पार्किंगची देखील मोठी समस्या आहे. वाहतूक कोंडीमुळे आधीच पुणेकर वैतागले आहेत. त्यात ठीक ठिकाणी विकास कामासाठी रस्ते खोदल्याने आहेत ते रस्ते वापरता येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी तर वाढते पण गाड्या पार्क कुठे करायच्या असा प्रश्न पुणेकरांना पडतो. अशातच वाहतूक पोलिस अनधिकृत ठिकाणी पार्किंग केल्यास तातडीने कारवाई करतात आणि गाडी उचलून चौकीवर नेतात. दंड भरल्याशिवाय गाडी परत मिळत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि पुणेकरांचे नेहमीच छोटे-मोठे वाद होत असतात. अशाच एका वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक पुणेकर थेट वाहतूक पोलिसांशी भिडला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, “वाहतूक पोलिसांच्या वाहनाने रस्त्यावरील दुचाकींवर कारवाई करत आहे. दरम्यान एका दुचाकीवर एक व्यक्ती बसलेला असताना ती दुचाकी धोकादायकरित्या उचलण्यात आलेली आहे. दुचाकी चालक आहे मुद्दाम दुचाकीवर बसून राहिला आहे.

 

 

व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मार्च अखेरीस पुणेकर” व्हिडीओवर कमेंट करताना अनेक पुणेकरांनी वाहतूक विभागाच्या या वाहनाबाबत आणि वाहतूक पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक पोलिस अनिधकृत वाहनांवर कारवाईचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप अनेक पुणेकर करत आहेत. अगदी २ मिनिटांसाठी देखील गाडी उभी केली तर दुचाकी उचलून नेतात किंवा चालक गाडीवर बसलेला असला तरीही गाडी उचलून नेतात.

 

 

एकाने कमेंट केली की, “पार्किंग देत नाही अन् गरीब जनतेला त्रास देतात.”

दुसऱ्याने कमेंट केली की,” आपल्या देशाला अशा एकनिष्ठ अधिकाऱ्याची गरज आहे जे तन मन धन एकत्र करून काम करतील. “

तिसऱ्याने कमेंट केली की, “सगळ्यात गंभीर गुन्हा आणि पूर्ण कायदेशीर कारवाई. वा! साहेब मानलं तुम्हाला सत्कार करून कोणता पुरस्कार द्यायचा ते पण सांगा…”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here