प्रियांका चोप्राच्या ‘या’ शॉर्ट फिल्मला ऑस्करमध्ये नामांकन

0
79

मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित अशा ऑस्कर हा अवॉर्ड सोहळा लवकरच पार पडणार आहे. ९७व्या अकादमी अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर करण्यात आले आहेत. गुरुवारी अकादमी अवॉर्डच्या नॉमिनेशन लिस्टची घोषणा करण्यात आली. यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशनमध्ये ‘एमिलिया पेरेज’ या सिनेमाला सर्वाधिक म्हणजे तब्बल १३ नॉमिनेशन मिळाले आहेत. तर ‘द ब्रूटलिस्ट’ आणि ‘विकेड’ या सिनेमांना १० कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहेत. प्रियांका चोप्राची शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ला देखील यंदाच्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.

 

 

‘अनुजा’ हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. प्रियांकाची निर्मिती असलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.