माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे पाय घसरून पडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेची आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोनाबाई बाबुराव घाडगे ही पाच महिन्याची गरोदर होती ती राहते घरात पाय घसरून पडल्याचे तीचे पती बाबुराव घाडगे याला मयत अवस्थेत दिसून आली आहे. याबाबत गोमेवाडीचे पोलीस पाटील, शामराव पाटील यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.