माणदेश एक्सप्रेस न्युज/ कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळचे पोलिस उपनिरीक्षक रविराज जमादार यांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अखेर निलंबित केले आहे. नांगोळे येथील भावाच्या आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी बोलावून तरुणाला मारहाण प्रकरणी रविराज जमादार यांना चांगलेच भोवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नांगोळे येथील सौरभ संजय वाले याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार याने आश्लेष वाले यास बोलावून घेत, भावाच्या मृत्यूस तूच जबाबदार आहे, तुझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल, तो करायचा नसेल तर एक लाख रुपये दे असे सांगितले होते.
आश्लेष याने माझ्या भावाने आत्महत्या केली आहे असे म्हंटल्यावर जमादार येणे रूग्णालयाच्या ठिकाणीच आश्लेष यास मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सदर प्रकरणी नातेवाईक व ग्रामस्थ यांनी गुरुवारी पोलीस ठाणे समोरे ठिय्या मारत रविराज जमादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सदर प्रकरणाची पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेत रविराज जामदार यास निलंबित केले आहे.