डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पोलिसांनी मध्यरात्री काढला ; आटपाडीत तणाव ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

0
2759

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काल मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. याबद्दल जिलेबी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु हा आनंद औटघटकेचा ठरला. सर्व भीम अनुयायी झोपत असतानाच पोलिसांनी मध्यरात्री पुतळा काढून घेतला. सदरची घटना समजताच मोठ्या संख्येने भीमसैनिक व भीम अनुयायी यांनी ठीक मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

आटपाडी शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसल्यामुळे भीमसैनिकांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत, शहरात पुतळा उभारण्याची मागणी विविध संघटनाकडून होत होती.
परंतु याकडे जाणीवपूर्वक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंबेडकर अनुयानांकडून केला जात होता. त्यामुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पुतळा कधी उभा राहणार? हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जात होता. सादर प्रकरणी परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखविली नाही.

 

आटपाडी शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, बाजार पटांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तसेच आबानगर चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हे सर्व पुतळे गनिमी काव्याने बसविण्यात आले होते.

 

शहरात प्रमुख महापुरुष यांचे पुतळे बसविण्यात आले होते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता. तोही गनिमी काव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आल्याने, भीमसैनिकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्धाकृती पुतळा बसविण्याबद्दल भीमसैनिकांनी जिलेबी वाटप करून आनंद व्यक्त केले.

 

पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मोठ्या बंदोबस्तात पुतळा काढून घेतला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या भीमसैनिकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेवून घेतले आहे. सदरच्या घटनेने मोठ्या संख्येने भीमसैनिक जमा झाले असून, ज्या पोलिसांनी पुतळा काढून नेला आहे, त्या पोलिसांनी सदर ठिकाणी पुतळा बसविला पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरु आहे.