पोलिसांनी मध्यरात्री काढलेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुन्हा बसवला ; आटपाडीतील तणाव निवळला; मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

0
1972

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काल मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. याबद्दल जिलेबी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु हा आनंद औटघटकेचा ठरला. सर्व भीम अनुयायी झोपत असतानाच पोलिसांनी मध्यरात्री पुतळा काढून घेतला.

 

सदरची घटना समजताच मोठ्या संख्येने भीमसैनिक व भीम अनुयायी यांनी ठीक मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परंतु सदर ठिकाणी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविल्याने तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र पोलिसांनी खबरदारी घेत पोलिसांनी बंदोबस्त मात्र सदर ठिकाणी तैनात केला आहे.

 

आटपाडी शहरात प्रमुख महापुरुष यांचे पुतळे बसविण्यात आले होते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता. तोही गनिमी काव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आल्याने, भीमसैनिकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्धाकृती पुतळा बसविण्याबद्दल भीमसैनिकांनी जिलेबी वाटप करून आनंद व्यक्त केले.
पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मोठ्या बंदोबस्तात पुतळा काढून घेतला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या भीमसैनिकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेवून घेतले आहे. सदरच्या घटनेने मोठ्या संख्येने भीमसैनिक जमा झाले असून, ज्या पोलिसांनी पुतळा काढून नेला आहे, त्या पोलिसांनी सदर ठिकाणी पुतळा बसविला पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते.

 

आटपाडी पोलिसांनी पोलीस ठाणे येथे सर्वाना बोलावून घेत या समजण्याचा प्रयत्न केला. परंतु भीमसैनिक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी काढलेल्या पुतळ्याची विटंबना झाली असल्याचे सांगत, पुतळा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी ठाम होते.

परंतु पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा काढताना कोणतीही विटंबना झाली नसल्याचे ग्वाही देत, पुतळा विधिवत काढला असून तो सुरक्षित असल्याचे सांगतिले. यावेळी तणाव काही प्रमाणत कमी झाला होता.

 

त्यानंतर सर्व भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमला. यावेळी दुसऱ्या अर्धाकृती पुतळ्या सदर ठिकाणी पुन्हा विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु भीमसैनिकांनी सदर ठिकाणी पुतळा बसविल्याने पहाटेपासून सुरु असलेला तणाव काही प्रमाणात कमी झाला. तणाव कमी झाला असला तरी, पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.