‘लाडकी बहीण योजना’ नंतर महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा; काय आहे पिंक ऑटो रिक्षा योजना?

0
375

 

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर सरकारने आता पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वीकृतिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 शहरांमध्ये पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. राज्यात कमीतकमी 10 हजार महिलांना फायदा होणार आहे. पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत पात्र महालांना 20 प्रतिशत रक्कम सरकार देईल.

राज्य सरकार अनुसार या योजनेने महिलांना शहरांमध्ये रोजगार देखील मिळेल. तसेच त्या आर्थिक परिस्थीनी भक्कम बनतील. यापूर्वी राज्यामध्ये राज्य सरकार ने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. यामध्ये सरकार ने 20 ते 65 वर्षाच्या महिलांना प्रतयेक महिन्याला 1500 देण्याची घोषणा केली होती. या योजनेची सुरवात 1 जुलै पासून झाली.

काय आहे पिंक ऑटो रिक्षा योजना?
महाराष्ट्र सरकार व्दारा घोषित पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी वित्तीय सहायता देण्यात येईल. याकरिता अधिकतम वित्तीय सहायता 80 हजार रुपये देण्यात येतील. योजना नुसार लाभार्थी महिला महाराष्ट्रच्या स्थायी निवासी असाव्या. महिला लाभार्थींजवळ ड्राइविंग लाइसेंस असणे गरजेचे राहील. व या योजनेचा लाभ 17 शहरांमध्ये 10 हजार महिलांना मिळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here