पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई – ५१ घुसखोर गजाआड

0
169

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस विभागाने राबवलेल्या ‘उजळणी’ मोहिमेमुळे आतापर्यंत ४ रोहिंग्या व ४७ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.

 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) ही मोहीम सुरु केली. आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवली. प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘एटीपी’ म्हणजेच दहशतवाद विरोधी कक्ष सक्रिय करण्यात आले असून, नियमित उजळणी शिबिरांच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांना संशयित घुसखोरांची ओळख कशी पटवावी याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

 

शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये, कामगार वसाहती, चाळी व घनदाट लोकवस्तीच्या भागांत घुसखोर आढळून येत आहेत. याठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक बांधकाम मजूर, भंगार संकलक किंवा इतर लघुउद्योगांमध्ये काम करत असल्याचे आढळले आहे.

 

या घुसखोरांकडून भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे – आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पासपोर्ट तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत ७४ पासपोर्ट आणि ४ पॅनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. काही घुसखोरांनी शहरात जमीन-जुमला खरेदी केली असून, त्यांच्याकडे बांगलादेशी सिमकार्ड आणि सोशल मीडियावरून परदेशी संपर्क आढळले आहेत. या मोहिमेमुळे बेकायदेशीर घुसखोरीवर आळा बसण्याची शक्यता असून, पोलिसांच्या या हालचालीमुळे शहरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here