
Remove acne scars at home : त्वचेवर मुरुमे-डाग येणे ही समस्या सामान्य असली तरी यामुळे त्वचा खराब दिसू लागतो. त्वचेची व्यवस्थित काळजी घेतल्यास मुरुमे लवकर बरे होतील. मुरुमे आणि डाग नाहीसे करण्यासाठी आपण अनेक ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो. परंतु, तरी देखील त्वचेवरील डाग कमी होत नाही. काही घरगुती प्रभावी उपाय केले तर चेहऱ्यावरील सुरकुत्या-मुरुमे कमी होतील.
- कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवरील डाग आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात.
- नारळाचे तेल केवळ त्वचेला पोषण देत नाही तर चेहऱ्यावरील डाग हलके करण्यास मदत करते. डाग कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.
- मध आपल्या त्वचेसाठी चांगले असते. यामुळे त्वचेवर मुरुमे येण्यापासून थांबवले जाते. चमचाभर मध त्वचेवर १५ मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा, असे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा.
- टी ट्री ऑइल हे आपल्या त्वचेसाठी प्रभावी ठरु शकते. यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेवरील मुरुमे आणि डागांच्या खुणा कमी करतात. हे वापरण्यापूर्वी तेलात मिसळून मुरुमांवर लावा.
- त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते.