
माणदेश एक्सप्रेस न्यूज | हेल्थ डेस्क :
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये महिलांना स्वतःच्या त्वचेची नीट काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. बाजारात उपलब्ध असलेली महागडी सौंदर्य उत्पादने खरेदी करतानाही अनेक जणी किंमत पाहून मागे सरकतात. मात्र, घरच्या घरी मिळणाऱ्या साध्या घटकांच्या मदतीनेही त्वचा तजेलदार व पिंपल्समुक्त करता येऊ शकते, हे फार थोड्यांना माहीत आहे.
इंस्टाग्रामवरील कंटेंट क्रिएटर वैशाली पाटील यांनी नुकतेच एक व्हिडिओ शेअर करत घरगुती आणि किफायतशीर स्किन केअर उपाय सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पपईच्या पानांपासून बनवलेला हा फेसपॅक चेहऱ्यावरील काळेपणा, पिगमेंटेशन आणि अतिरिक्त तेल दूर करून त्वचेला उजळ व नितळ बनवतो.
पपईच्या पानांचा फेसपॅक कसा तयार करावा?
१ ताजे पपईचे पान घ्या
त्यात थोडे बेसन घाला
१ चमचा मध टाका
हे तिन्ही घटक मिक्सरमध्ये टाकून गुळगुळीत पेस्ट बनवा
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर पातळ थर लावा
१५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा
नियमित वापर केल्यास त्वचा स्वच्छ, चमकदार आणि मऊ होण्यास मदत मिळते.
घटकांचे फायदे
🔸 पपईची पाने – यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेतील घाण, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल दूर करून रोमछिद्रे स्वच्छ करतात.
🔸 बेसन – नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्वचेचा रंग उजळवते, टॅनिंग व डार्क स्पॉट्स कमी करते.
🔸 मध – मॉइश्चरायझिंग व अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेटेड राहते. पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला मृदुता मिळते.
बहुतेक वेळा महिला स्वतःसाठी खर्च करायला मागेपुढे पाहतात. बाजारातील महागडे केमिकलयुक्त उत्पादनांच्या तुलनेत हा उपाय स्वस्त, सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. यामुळे केवळ चेहऱ्यावरील चमक वाढत नाही, तर त्वचेवर कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत.
चमकदार त्वचेसाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. पपईची पाने, बेसन आणि मध यांचा वापर करून तयार केलेला फेसपॅक हा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्याय ठरू शकतो. मात्र, कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी तो त्वचेला सूट होतो का हे तपासणे महत्त्वाचे आहे.