आठवड्यातून २ वेळा पपईचा मास्क लावा; पिंपल्स, मुरुमं, मृत पेशी आणि टॅनवर रामबाण उपाय

0
13

माणदेश एक्सप्रेस न्युज | हेल्थ डेस्क
पपई हे केवळ पचनासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही वरदान आहे. पचनशक्ती वाढवणे, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकणे आणि स्त्रियांच्या पाळीचा त्रास कमी करणे यासाठी पपई खाल्ली जातेच, पण त्वचेसाठी तिचा मास्क लावल्यास अनेक समस्यांवर उपाय मिळतो. पपईतील नैसर्गिक पोषकद्रव्ये आणि एंझाईम्स त्वचेला आतून पोषण देतात, मृत पेशी दूर करतात आणि चेहऱ्याचा उजळपणा वाढवतात.


पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम, जीवनसत्त्वे A, C, E, बीटा-कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. हे घटक त्वचेतील छिद्रे स्वच्छ ठेवतात, दाह कमी करतात आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्यामुळं पिंपल्स, ब्लॅकहेड्स-व्हाइटहेड्स, डाग, पिग्मेंटेशन, टॅन आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.


  1. पिकलेल्या पपईचे तुकडे करून साल व बिया काढा.

  2. गर मिक्सरमधून फिरवून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  3. या पेस्टमध्ये –

    • एक चमचा मध घातल्यास त्वचेला आर्द्रता मिळते.

    • एक चमचा दही घातल्यास टॅन कमी होतो आणि थंडावा मिळतो.

    • कोरड्या त्वचेसाठी काही थेंब लिंबाचा रस किंवा गुलाबपाणी मिसळता येते.

तयार झालेला हा मास्क चेहरा व मानेवर हलक्या हाताने लावा. १५-२० मिनिटे तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा.


आठवड्यातून २ ते ३ वेळा हा मास्क लावल्यास त्वचेला आवश्यक पोषण, आर्द्रता आणि नैसर्गिक उजळपणा मिळतो. नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी होतो, त्वचा मऊसर व तजेलदार होते.


बाजारातील केमिकलयुक्त फेसपॅकच्या तुलनेत हा मास्क पूर्णपणे नैसर्गिक आणि सौम्य आहे. त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. नियमित वापरामुळे –

  • मृत पेशी दूर होतात,

  • त्वचा उजळते,

  • छिद्रं स्वच्छ राहतात,

  • पिंपल्स आणि मुरुमांचा त्रास कमी होतो,

  • तसेच वृद्धत्वाच्या खुणा उशिरा दिसतात.


पपई हा फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही रामबाण उपाय आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पपईचा हा मास्क वापरल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून न राहता घरच्या घरी सोपा, सुरक्षित आणि स्वस्त उपाय म्हणून पपई मास्क नक्की वापरावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here