इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल

0
60

माणदेश एक्सप्रेस/मंबई : “महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बंधनकारक आहे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती शिकता येते. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला पालख्या हे कुठले विचार आहेत?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला. या वर्षीपासून महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून त्यानुसार, सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा असून ती अनिवार्य करण्यात आली आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

 

हिंदी भाषेवरुन कालपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. फजणवीस म्हणाले, ” मी याबद्दल आधीच बोललो आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठलीही भाषा शिकायची असेल तर ती शिकता येते. पण मला कधीकधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध करता मग इंग्रजीला का नाही ? इंग्रजीसाठी पालख्या आणि हिंदीला विरोध, हा कुठला विचार आहे ?, असा सवाल सीएम फडणवीस यांनी केला. (स्त्रोत-लोकमत)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here