राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा उद्देश ठेवून राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पा राज्य सरकारने योजनांच्या घोषणांची बरसात केली. त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. ती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र यानंतर, बहिणींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका भाऊ’ या योजनेची घोषणा केली.
राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा उद्देश ठेवून राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गंत 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. 12वी उत्तीर्ण, आयआयटी प्रमाणपत्र धारक, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार असून त्यावेळी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ती कागदपत्र कोणती ? तसेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जर तुम्हाला माझा लाडका भाऊ योजनेचा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे :
– आधार कार्ड – रहिवासी प्रमाण पत्र – वयाचे प्रमाणपत्र
– पत्त्याच्या पुरावा
– ड्रायव्हिंग लायसन्स
– शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
– मोबाइल नंबर
– पासपोर्ट साइज फोटो
– बँक खात्याचे पासबूक
योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे वर नमूद केलेली कागदपत्रे हवीच.
लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ?
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.