
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली असून, झरे येथे विजयाचा जल्लोष करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईने देशवासीयांच्या मनात असलेला रोष व्यक्त करत पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय महिलांच्या सिंदूरवर झालेल्या आघाताचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया मिळत आहे.
या ऐतिहासिक कारवाईच्या समर्थनार्थ झरे येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, सरपंच अंकुश पाटील, प्रणव गुरव, यांच्यासह झरे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, खेडकर यांनी सांगितले की, “देशासाठी शत्रूला दिलेले हे प्रत्युत्तर आमचा अभिमान वाढवणारं आहे. पंतप्रधान, नरेंद्र नोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, अजित डोवल व देवाभाऊ यांच्या पाठीशी सर्व नागरिक उभे असून, या घटनांमुळे देशाच्या सुरक्षाबलांवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.