एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका

0
56

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे अनेकदा मोठमोठे अपघात होतात. त्यातील अनेक अपघातांमध्ये चूक नसूनही अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमावावा लागतो. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावरदेखील व्हायरल होतात. अशाच अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ पाहून आपण खळखळून हसतो अन् आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओ पाहून आपण घाबरतो, आपल्याला धडकी भरते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

 

खरं तर मृत्यू कधी, कोणाला, कोणत्या ठिकाणी गाठेल हे सांगता येत नाही. अनेकदा काहींचा बसल्या जागी, तर कधी झोपेतही मृत्यू होतो. तर अनेक जण अनेक वर्षांपासून एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असूनही ते दीर्घायुषी असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावरून एक बाईकस्वार जात असताना अचानक तो रस्त्यावर गाडीसकट खाली पडतो. यावेळी बाजूने एक ट्रक वेगाने येतो आणि त्या खाली पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाताना दिसतो. नक्की काय झालं असेल हे पाहायला अनेक जण गोळा होतात. परंतु, ती व्यक्ती उठून उभी राहते आणि हेल्मेट घालून पुन्हा गाडीवर बसून निघून जातो. ट्रक इतक्या जवळून जाऊनही ती व्यक्ती सुखरूप राहते. हा अविश्वसनीय व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

 

 

त्यावर आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “शेवटी देवाची कृपा आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “अशा वेळी हेल्मेट घालायला हवे.”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here