पात्रेवाडीत गाडी आडवी मारण्यावरून एकाला मारहाण

0
754

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडी येथे मोटरसायकल गाडी आडवी मारण्यावरून एकाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 

याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी, रमेश दुर्योधन जाधव वय-४४ वर्षे रा. पात्रेवाडी हे त्यांचेकडील मोटारसायकल वरून पात्रेवाडी गावी जात आसताना यातील आरोपी शिवराज धनाजी गायकवाड, अमित सदाशिव पाटील रा. पात्रेवाडी यांनी मोटारसायकल वरुन येवुन फिर्यादीस तु मला गाडी आडवी का मारली असे म्हणुन शिवीगाळ केली.

 

तसेच तेथे पडलेल्या बांबुच्या काठीने आरोपी शिवराज गायकवाड याने फिर्यादीच्या उजव्या व डाव्या दंडावर, हतावर, पाठीवर मारहाण करुण जखमी केले आहे. फिर्यादीचे सोबत आसलेले मारुती वसंत जाधव हे सोडवण्यासाठी आले आसता त्यांना आरोपी नं २ अमित सदाशिव पाटील याने त्यांना लाथाबुक्यानी मारहाण केली आहे. सदर घटने बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here