
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
बॉलिवूडच्या किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आपल्या पहिल्याच वेबसीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याच्या बहुचर्चित ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (Bads of Bollywood) या सीरिजचा भव्य ट्रेलर काल विशेष कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या ट्रेलरसोबतच चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण झाला असून, सोशल मीडियावर सध्या या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे.
शाहरुखचा सपोर्ट, मुलाच्या कामाचे कौतुक
ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये किंग खान शाहरुख खान स्वतः उपस्थित होता. मुलगा आर्यनच्या दिग्दर्शनातील कौशल्याचे कौतुक करताना शाहरुख म्हणाला की, “आर्यनने जे काही केलंय, ते पाहून अभिमान वाटतो. त्याचा चार्म, त्याची दृष्टी आणि त्याचा आत्मविश्वास कमाल आहे.” या प्रसंगी शाहरुख-आर्यनमधील बापलेकांची केमिस्ट्री सर्वांच्या लक्षात राहिली.
ट्रेलरची धमाकेदार झलक
ट्रेलरची सुरुवात शाहरुख खानच्या दमदार व्हॉइसओव्हरने होते – “बॉलिवूड एक सपनों का शहर, पर ये शहर सबका नही होता…” यानंतर लक्ष्य लालवानीची जबरदस्त एन्ट्री दिसते. त्याचबरोबर राघव जुयाल, सेहर बम्बा, मोना सिंह, बॉबी देओल यांच्याही झलकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यात विशेष म्हणजे करण जोहर, सलमान खान आणि रणवीर सिंग यांचे सरप्राईज कॅमिओदेखील पाहायला मिळतात.
स्वतःवरच केला जोक
ट्रेलरच्या शेवटी एक डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे – “टेन्शन नही लेने का, अंदर जाके लोग और भी फेमस होते है.” हा डायलॉग पोलिस पात्र लक्ष्यला जेलच्या बाहेर येताना म्हणताना दिसतो. हा संवाद प्रत्यक्षात आर्यन खानने स्वतःवरच केलेला जोक असल्याचं मानलं जात आहे. कारण काही काळापूर्वी आर्यनला ड्रग्स प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. या संदर्भानेच त्याने स्वतःचाच विनोदी अंदाजात उल्लेख केला आहे.
स्टारकास्ट आणि कथा
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये लक्ष्य लालवानी आणि राघव जुयाल पुन्हा एकदा ‘किल’नंतर एकत्र आले आहेत. त्यांच्या सोबत सेहर बम्बा, मोना सिंह आणि बॉबी देओल यांसारखे दमदार कलाकार आहेत. ट्रेलरवरून ही सीरिज अॅक्शन, ड्रामा आणि तगड्या डायलॉग्सने भरलेली असल्याचं स्पष्ट दिसतंय.
प्रेक्षकांचा प्रतिसाद
ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा डेब्यू नाही असं वाटतच नाही,” “आर्यनचा स्टाईल वेगळाच आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
रिलीजची तारीख
या सीरिजची प्रचंड चर्चा सुरू असून, प्रेक्षकांना आता रिलीजची आतुरता लागली आहे. १८ सप्टेंबर रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.