बीएमडब्ल्यू कारमधील प्रवाशांना आता आलिशान कारचा फील मिळेल. या कारमध्ये थिेएटरची स्क्रीन लावण्यात आली आहे. रिअर सीटवरील प्रवाशांना मनोरंजनासाठी 31.3-इंचाची थिएटर स्क्रीन देण्यात आली आहे. ही कार प्रवाशांना सिनेमाचा फील देते. थिएटर स्क्रीनमध्ये 8K स्क्रीन सिस्टम लावण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूने 7 सीरीज मॉडलमध्ये नवीन फीचर लाँच केले होते.
BMW च्या कारमध्ये थिएटर स्क्रीन
बीएमडब्ल्यूने या थिएटर स्क्रीन लाँच केली होती. त्यात मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांना मनोरंजनाचा आनंद लुटता येईल. ही स्क्रीन इलेक्ट्रिकल कारच्या रुफ येथून खाली करता येते. या ठिकाणी थिएटरचा फील देण्यात येतो. ही 8K स्क्रीनचा फील देतो. . बीएमडब्ल्यूच्या कारमध्ये थिएटर स्क्रीनचा पर्याय चीनमध्ये देण्यात आला आहे.
भारतात आले BMW 5 सीरीज मॉडल
बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात BMW 5 सीरीज मॉडल आणले आहे. बीएमडब्ल्यू 5 सीरीज LWB भारतीय बाजारात सादर झाली आहे. या कारमध्ये लॉन्ग-व्हीलबेस देण्यात आला आहे. पण आलिशान कार तयार करणाऱ्या या कंपनीने जी कार भारतात आणली आहे, त्यात थिएटर स्क्रीन दिली नाही. . ही कार पेट्रोल, डिझेल या पर्यायात उपलब्ध आहे. तर परदेशात हायब्रीड या इंधन पर्याय देण्यात आला आहे. ही कार 6.5 सेकंदात 0-100 किलोमीटरचा वेग गाठते. तर 250 किलोमीटर प्रति ताशी हा तिचा सर्वाधिक वेग आहे.
का नाही देण्यात आली थिएटर स्क्रीन?
BMW समूहाचे उपाध्यक्ष जीन-फिलिप पॅरेन यांनी भारतातील कारमध्ये थिएटर स्क्रीन न देण्याचे कारण सांगितले आहे. पॅरेन यांच्या मते, भारतात कंपनीच्या 5 सीरीजमध्ये थिएटर स्क्रीन असेंम्बल करणे एक कठीण कार्य आहे. त्यामुळे या कारमध्ये थिएटर स्क्रीन देण्यात आलेली नाही.
भारतात बीएमडब्ल्यूच्या या फीचरची सर्वाधिक चर्चा आहे. बीएमडब्ल्यूने थिएटर स्क्रीन भारतात सादर न करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. पण लवकरच हे फीचर भारतीय कारमध्ये सादर करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. बीएमडब्ल्यूच्या कारमध्ये थिएटर स्क्रीनचा पर्याय चीनमध्ये देण्यात आला आहे.