
Viral Video : आजकाल व्हीआयपी लोकांसाठी झेड+ सिक्युरिटी” म्हणून काळ्या एसयूव्ही गाड्यांचा ताफा आणि सशस्त्र रक्षकबरोबर असतात. पण एका चिमुकलीने “झेड+ सिक्युरिटी”चा शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. चिमुकलीची झेड+ सिक्युरिटी” पाहून नेटकरी थक्क झाले आहे. सोशल मीडियावर एक लहान मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकली चक्क एका भटक्या श्नानाच्या पाठीवर बसून रस्ता ओलांडच आहे. एवढेच नाही तर रस्ता ओलांडताना तिच्याबरोबर श्वानांची संपूर्ण टोळीला देखील आहे. चिमुकलीची ही झेड+ सिक्युरिटी” सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक उल्लेखनीय दृश्य दिसते: एक लहान मुलगी शांतपणे एका श्वानाच्या पाठीवर स्वार होत आहे, तिच्याबरोबर किमान सहा इतर कुत्रेही आहेत जे तिच्या शेजारी संरक्षक पथकासारखे चालताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर श्वानांचे कित्येक व्हिडिओ समोर येतात ज्यामध्ये कधी श्वान लोकांवर हल्ला करताना दिसतात तर कधी लोक श्वानावर हल्ला करताना दिसतात. ज्यामुळे भटक्या श्वानांपासून लोक चार हात लांबच राहतात अशा परिस्थितीमध्ये एक चिमुकली भटक्या श्वानांवर खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तर या भटक्या श्वानांनी देखील तिच्यावर जीव लावला आहे म्हणूनच की काय ते सतत तिच्या मागे पुढे करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली चक्क श्वानाच्या पाठीवर बसून तो घोडा असल्यासारखी खेळत आहे पण तरीही ते श्वान तिला काहीच करत नाही. उलट तिच्याबरोबर आनंदाने खेळत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, एखाद्या उत्तम घोडेस्वाराप्रमाणे ती श्वानावर आत्मविश्वासाने बसते. त्यानंतर ती मुलगी राजेशाही थाटात ती चिमुकली रस्ता ओलांडते. एका क्षणी, श्वान रस्त्याच्या दुभाजकाजवळ थांबतो. ती मुलगी ऐटीत श्वानाच्या पाठीवरून उतरते. थोडे अंतर पायी चालते. नंतर पुन्हा त्याच्या पाठीवर स्वार होते आणि रस्ता ओलांडते.
एकाने कमेंट केली की,ही खरी झेड प्लस सुरक्षा”, मुलीबरोबर चालणाऱ्या या निष्ठावंत, स्वयंघोषित अंगरक्षकांना सलाम”
दुसऱ्याने कमेंट केली, “चिमुकलीला एखाद्या राजकुमारी सारखी वागणूक दिली जात आहे”
तिसऱ्याने म्हटले, मी खूप दिवसांनतर इतका गोंडस व्हिडिओ पाहिला.
हा व्हिडिओ पाहून हशा आणि कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, तो मानव आणि प्राण्यांमधील प्रेमळ नात्याची झलकही दाखवत आहे.
Real Z+ Security 🥰✅ pic.twitter.com/MQxWk9pYzj
— 🍁 (@annju_00) May 21, 2025