
माणदेश एक्सप्रेस न्युज
खानापूर : खानापूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या निसर्ग फाउंडेशन संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना निसर्ग सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी आपला प्रस्ताव दि 10 एप्रिल पूर्वी संस्थेचे प्रकल्प संचालक श्री प्रमोद भोसले यांच्या व्हाट्सअप क्रमांक 9545716069 वर पाठवावे असे आवाहन संस्थेचे सहकार्यवाह फिरोज शेख यांनी केले आहे.
निसर्ग फाउंडेशन या संस्थेने खानापूर तालुक्यात उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेने ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका सुरु केली आहे. दरवर्षी वर्धापन दिन निमित्ताने समजपयोगी उपक्रम संस्था हाती घेते. यंदाचा वर्धापन दिन निसर्ग सन्मान सोहळ्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पर्यावरण, पत्रकारिता, क्रीडा, सहकार, उद्योग, आरोग्य, कृषि, महिला सबलिकारण, युवा, अश्या विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्थाचा सन्मान करण्यात येत आहे.
संस्थेने पुरस्कारासाठी त्रि सदस्य समिती ची निवड समिती स्थापन केली आहे. प्राप्त होणाऱ्या नामांकानातून 10 मान्यवर व 5 संस्थाची निवड पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपात्र, प्रमाणपत्र, पुस्तक, शाल व झाड असे असून सदरचा सोहळा लेंगरे येथे आयोजित करण्यात येईल. अशी अधिकृत माहिती संस्थेचे सहकार्यवाह श्री. फिरोज शेख यांनी दिली. तर सर्व मान्यवरांनी आपले प्रस्ताव पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.