निसर्ग फाउंडेशनच्या नुतन कार्यकारणीचे आम. सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार

0
148

माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील निसर्ग फाउंडेशन लेंगरे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीत सल्लागार पदी सुनिल शिंदे-पाटील, जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.संजय ठिगळे, सहकार्यवाह पदी फिरोज शेख, सरचिटणीस पदी निवास कदम, समन्वयकपदी डॉ. शिवाजी गुजर, कार्याध्यक्ष पदी नवनाथ सगरे यांची निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकारी यांना खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

याप्रसंगी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेली निसर्ग फाउंडेशन संस्था ही तालुक्यातील सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. संस्थेने ग्रामीण भागात स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सुरु केली आहे. पर्यावरण व स्वच्छ भारत अभियानात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. आज या संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक कामात नेहमी सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. ही सर्व मंडळी संस्थेला प्रगतीपथावर पोहचवतील आणि यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम व लोकहितार्थ कार्य घडेल असा मला विश्वास आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कायम निसर्ग फाउंडेशन च्या मागे भक्कमपणे उभा आहे.

 

 

यावेळी निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक, उपाध्यक्षा डॉ. वैशाली हजारे, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, युवानेते प्रकाश बागल, संस्थेचे खजिनदार भगवान जाधव, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, सदस्य सुरज मंडले, पुजा चंदनशिवे, जीवन धेंडे, अभि गायगवळे, प्रतिक्षा जाधव, यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here