अमृता फडणवीसांच्या आवाजातील नवं कोरं गाणं प्रदर्शित

0
529

Amruta Fadnavis New Song: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले होते. आता या गाण्याच्या यशानंतर त्यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 

 

अमृता यांचं ‘Laal Ferrari’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. यात अभिनेत्री श्रुती सिन्हा आणि सनम जौहर दिसून येत आहे. हे गाणं आदित्य देव यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर गीतकार शब्बीर अहमदने लिहिलं असून अमृता फडणवीसांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘Laal Ferrari’ रिलीज केलं आहे. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

 

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाणी आपल्या आवाज संगीतबद्ध केली असून ती युट्युबवर उपलब्ध आहेत. बँकर असण्यासोबतच त्या एक उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अनेक नवीन गोष्टी त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नेहमीच त्यांच्या बिनधास्त वागण्यासाठी, तसेच स्पष्ट बोलण्यावरुन अनेकदा चर्चेचा विषय बनतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here