वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा खुलासा; निलेश चव्हाणच्या धक्कादायक कृत्यांचा पोलिस तपासात पर्दाफाश

0
523

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे. या प्रकरणात सातत्याने चर्चेत असलेल्या निलेश चव्हाण याच्याविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, निलेशचे हगवणे कुटुंबीयांशी घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. विशेष म्हणजे वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ देखील काही काळ निलेशच्या ताब्यात होते.

 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाणने आपल्या पत्नीवरही अत्याचार केले होते. त्याने स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकाराची माहिती निलेशच्या पत्नीला २०१९ मध्ये मिळाली होती. तिने त्वरित वारजे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर पत्नीला धमकावणे, मारहाण करणे आणि मानसिक छळ करण्याचे आरोप झाले होते.

 

त्याचप्रमाणे, निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणेचा जवळचा मित्र असल्याचे समोर आले आहे. वैष्णवी आणि तिचा पती शशांक यांच्यातील वादात तो अनेकदा हस्तक्षेप करायचा, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

 

 

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अलीकडेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीच तिच्या सासू, पती आणि नणंदला अटक करण्यात आली होती.

 

 

या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळवली असून, पोलिस तपास अधिक गतीने सुरु आहे. निलेश चव्हाणच्या भूमिकेबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, हगवणे कुटुंबीयांशी असलेल्या त्याच्या संबंधांचीही बारकाईने छाननी केली जात आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here