गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून आटपाडी आगाराला नव्या बसेस;ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते लोकार्पण

0
495

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी आगार येथे पाच नव्या एस.टी. बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, माजी सभापती जयवंत सरगर, विनायककाका पाटील, विष्णू अर्जुन, चंद्रकांत दौंडे, राहूल सपाटे यांच्यासह भाजपचे तालुक्यातील विविध कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच तसेच सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमात बोलताना ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आटपाडी तालुक्यासाठी नवनवीन गाड्यांची मागणी सातत्याने केली. त्यांचा हा पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला असून तालुक्याला आज पाच नव्या गाड्यांची भेट मिळाली आहे. हा दिवस तालुक्यासाठी आठवड्याच्या वैभवात भर घालणारा आहे.”

 

पुढे बोलताना त्यांनी आमदार पडळकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत सांगितले, “ते आमदार झाल्यापासून आटपाडी व जत तालुक्यात विकासाची नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून एस.टी. महामंडळाचे कार्य अधिक गतिमान झाले असून तालुक्याच्या विकासासाठी ते सातत्याने झटत आहेत. ही पाच गाड्यांची सेवा हे त्याचेच फलित आहे.”

 

तसेच, ब्रम्हानंद पडळकर यांनी आणखी गाड्यांची मागणी करत, “पाच गाड्यांवर आमचा निभाव लागणार नाही, आमदार साहेबांनी आणखी गाड्या तालुक्यासाठी मंजूर करून द्याव्यात. त्यांच्या वजनाचा उपयोग आमच्या भागाच्या विकासासाठी व्हावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहू शकले नाहीत, ते सांगली येथील डीपीच्या बैठकीला गेले होते. मात्र त्यांच्या शिलेदारांनी आणि एस.टी. संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळी एस.टी. बसेसला गुलाबांच्या फुलांचा हार घालण्यात आला होता. तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here