नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर..वाचा सविस्तर

0
55

नीट परीक्षेचा मोठा गोंधळ देशभरात बघायला मिळतोय. नीट परीक्षा परत घेतली जातंय. नीट परीक्षेच्या निकालानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतली जातंय. नीट परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहोचले. हेच नाहीतर अनेक ठिकाणी पेपर फुटल्याचाही दावा करण्यात आला. त्यानंतर ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 23 जून 2024 रोजी परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

अचानक ही 23 जून 2024 नीट परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून परीक्षेच्या नव्या तारखेची वाट पाहताना दिसले. आता नवीन तारीख ही जाहीर करण्यात आलीये. नीटची परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. आता अवघ्या काही दिवसांवर ही परीक्षा आलीये. प्रश्नपत्रिका ही तीन तास अगोदर तयार होणार आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG 2024 परीक्षेची डेटशीट जारी केली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होईल. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना 720 मार्क पडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यामध्ये असे बरेच विद्यार्थी होते, ज्यांनी एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.

विशेष म्हणजे 2023 मध्ये असा एकही विद्यार्थी नव्हता, त्याला 720 पैकी 720 मार्क पडले. मात्र, यंदा अचानक 720 पैकी 720 विद्यार्थ्यांना मार्क पडले आणि एवढ्या मोठ्या संख्येत. या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. आता NEET PG 2024 ची परीक्षा दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे.

23 जून 2024 ची परीक्षा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील स्पर्धात्मक परीक्षांच्या अखंडतेबद्दल चिंतेचे कारण देत परीक्षा पुढे ढकलली होती. आता तिच परीक्षा 11 तारखेला घेतली जाणार आहे. या परीक्षेकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. हेच नाही तर नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले होते.