लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, निलम गोऱ्हेचे आश्वासन

0
190

माणदेश एक्सप्रेस/सांगली : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी येथे दिले. सांगली येथील दैवज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

यावेळी संपर्कप्रमुख सुनिता मोरे, जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, संजय विभुते, ज्योती दांडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते.

 

 

राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल काय? याची आखणी केली जात आहे. २१०० रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकांना मात्र याचा राग आहे. आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे.

 

 

त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी. बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती मला द्यावी.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here