
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी)विद्यार्थी समाधान बाड व चैतन्य कुंभार यांची महाराष्ट्र मुंबई पोलीस दलात भरती झाली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
समाधान बाड व चैतन्य कुंभार यांनी एनसीसी प्रशिक्षणादरम्यान शारीरिक क्षमता, शिस्तप्रियता आणि नेतृत्त्वगुणांचा उत्तम ठसा उमटवला. त्यांच्या मेहनतीला पोलीस भरतीत यश मिळाल्याने महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.एनसीसी विभागातील विद्यार्थिनी कु.सानिका गायकवाड हिची आर्मी डे परेड साठी पुणे येथे निवड झाली होती.याबद्दल तिचा व पोलीस दलामध्ये भरती झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अमरसिंह बापू देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले, माजी प्रभारी प्राचार्य मेजर डॉ. विजय लोंढे, डॉ.हणमंत सावंत, प्रा.नेताजी धायगुडे तसेच एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विजय शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, एनसीसी विभागाने विद्यार्थ्यांना पोलीस, लष्कर व अन्य संरक्षण दलांत सहभागी होण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका,प्रशासकीस सेवक,विद्यार्थी आणि कुटुंबीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी सीनियर अंडर ऑफिसर वैभव गायकवाड जुनिअर अंडर ऑफिसर सुरज कुंभार, किरण देशमुख व औदुंबर बाड उपस्थित होते.