ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा देशव्यापी संप, बँकिंग कामकाजात लक्षणीय व्यत्यय

0
451

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने देशव्यापी संप पुकारल्यामुळे आज (28ऑगस्ट) संपूर्ण भारतातील बँकिंग कामकाजात लक्षणीय व्यत्यय (Banking Services Disrupted) येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंडियाने बँक कर्मचारी युनियनच्या तेरा पदाधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संप पुकारला आहे. AIBEA चे सरचिटणीस CH वेंकटचलम यांनी या संपाची घोषणा केली. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून संपातील मागण्या आणि कारणे जाहीर केली. युनियनच्या कामकाजात “राजकीय हस्तक्षेप” होत असल्यावर त्यांनी अधिक जोर दिला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यासह इतर अनेक बँक युनियनने या संपाला पाठिंबा दिला आहे.

बँकिंग सेवांवर परिणाम:
संप जसजसा वाढत जाईल, तसतसे देशव्यापी व्यवहार आणि ग्राहक समर्थनासह बँकिंग सेवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही बँका खुल्या राहू शकतात, परंतु ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी भेट देण्यापूर्वी त्यांच्या संबंधित SBI, ICICI, HDFC आणि इतर बँकांच्या शाखा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

संपाचे कारण:
केरळमधील बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या 23 व्या द्विवार्षिक परिषदेत सहभागी झालेल्या बँक ऑफ इंडियाच्या तेरा अधिकाऱ्यांवर बँक ऑफ इंडियाने कारवाई केली. त्या विरोधात AIBEA ने हा संप पुकारला आहे. बँकेने या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी केले. ही नोटीस म्हणजे बँकिंग उद्योगातील संघटित कामगार चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे युनियनचे मत आहे.

दरम्यान, तुम्हाला बँक व्यवहार करायचा आहे मात्र, संपामुळे अडथळा येत असेल तर, काळजीचे कारण नाही. तुम्ही ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देऊ शकता. पैसे पाठवणे, अथवा स्वीकारणे, खरेदी-विक्री, यांसारख्या व्यवहारांसाठी तुम्ही ऑनलाईन प्रणाली वापरु शकता. बँक कार्मचाऱ्यांचा संप असल्याने तुम्हाला केवळ बँक कार्यालयात जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांमध्येच मर्यादा येऊ शकते. जसे की, चेक दाखल करणे, पासबूक भरणे किंवा नवीन पासबूक नोंद घेणे, बँक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे वगैरे.. वैगैरे. अर्थता सध्याचा काळ हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा असल्याने बहुतेक नागरिक डिजिटल व्यवहारांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे तसेही प्रत्यक्ष बँकांमध्ये जाऊन व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा तसा फटका नागरिकांना फारसा बसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here