आरोग्याबाबत खूप काही सांगतात नखं, कोणत्या आजारात कशी दिसतात नखं!; वाचा सविस्तर

0
237

बोटांची नखं हाताचं सौंदर्य वाढवतात, सोबतच नखांवरून शरीराच्या आत काय सुरू आहे हेही माहीत पडतं. नखं काही आजारांचे संकेतही देतात, त्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. नखांवर कोणकोणत्या आजारांची माहिती मिळू शकते. या समस्या लाइफस्टाईलच्या काही चुकांमुळे होऊ शकतात.

 

नखांवर दिसतात आजारांचे संकेत

नखांवर पांढरे डाग

नखांवर दिसणारे पांढरे डाग किंवा स्पॉच्स कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. त्याशिवाय शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि आयर्नची कमतरता किंवा थायरॉइड डिसऑर्डर झाल्यावरही नखांवर पांढरे डाग येतात.

 

नखं तुटणे

जर तुमची नखं सहजपणे तुटक असतील किंवा त्यांना भेगा पडत असतील तर हा शरीरात व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशिअम किंवा व्हिटॅमिन बी १२ कमी असल्याचा संकेत असू शकतो.

 

मुलायम आणि ड्राय नखं

कमी प्रोटीन असलेली डाएट घेतल्यानं नखं मुलायम आणि ड्राय होऊ शकतात. त्याशिवाय लिव्हरमध्ये काही समस्या असल्यावर नखांवर अशाप्रकारचे संकेत दिसतात.

 

निळे किंवा पर्पल नखं

ऑक्सीजनची कमतरता किंवा फुप्फुसं व हृदयासंबंधी समस्या असल्यावर नखं निळे किंवा जांभळ्या रंगाचे दिसू शकतात. अशात तुमची नखं जर निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

 

पिवळे किंवा वाकडे

शरीरात आयर्न कमी झालं असेल तर नखं पिवळ्या रंगाची आणि चमच्याच्या आकाराची दिसू शकतात. जर नखं आतल्या बाजूनं वाकलेली असतील तर शरीरात आयर्न कमी असू शकतं.

 

पिवळी नखं

नखं जर पिवळ्या रंगाची दिसत असतील तर लिव्हरसंबंधी समस्या आणि फंगल आजारांचा संकेत असू शकतो. जर नखं पिवळ्या रंगाची दिसत असतील तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांना संपर्क करा.

 

 

लाइफस्टाईलमध्ये करा बदल

– हेल्दी आणि संतुलित आहार घ्या.

– रोज कमीत कमी एक तास फिजिकल अॅक्टिविटी करा.

– पुरेशी म्हणजे रोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.

– शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर म्हणजे ८ ते १० ग्लास पाणी प्या.

– स्ट्रेस कमी करा. यासाठी प्राणायाम किंवा इतर एक्सरसाईज करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here