वर्दीतली मायमाऊली! पोलीस महिला कर्मचारी बनवतेय वारकऱ्यांसाठी पोळ्या, वारीत सेवा देणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

0
234

Viral Video : पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करते. पोलीसांमुळे आपण सुरक्षित जीवन जगतो. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे. ते त्यांचे कर्तव्य व जबाबदारी पार पाडत जनतेची सेवा करतात. वेळेची तमा न बाळगता २४ तास काम करतात. दिवाळी, दसरा, होळी, गणेशोत्सव किंवा कोणत्याही सार्वजानिक कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था राखतात. आता आषाढी वारीत सुद्धा लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या गैरसोय म्हणून मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे. सध्या असाच वारीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी वारकऱ्यांसाठी पोळ्या बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. ही महिला पोलीस कर्मचारी वारीत दुहेरी सेवा देताना दिसत आहे.

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला स्वयंपाक करताना दिसेल. विशेष म्हणजे या व्हिडीओत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती या महिलांबरोबर स्वयंपाक करताना दिसत आहे. ती महिलांसह पोळी लाटताना दिसते. विशेष म्हणजे वर्दी घातलेली ही पोलीस महिला कर्मचारी मनसोक्तपणे पोळ्या लाटताना दिसते. ती पोळ्या लाटताना तिच्या पायातील शूज काढते. यावरून तुम्हाला ही महिला पोलीस कर्मचारी महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा कशी जपतेय, हे सुद्धा दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “चांगल्या आई बापाचं लेकरू आहे.”

 

 

एका युजरने लिहिलेय, “गावाकडची आहे. शहरी भागातल्या मुली अशा येणार पण नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “पांडुरंग तुझाच आहे ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सहकार्याला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम” एक युजर लिहितो, “आईने खूप छान शिकवण दिली. अभिनंदन म्हणूनच पांडुरंगाने नोकरीं दिली. माझ्या ३७ वर्षात अशी मुलगी पहिली नाही. मी ही या खात्यात अधिकारी होतो, अभिमान आहे” तर एक युजर लिहितो, “स्त्री ही स्त्री असते, सॅल्यूट या ताईला” तर एक युजर लिहितो, “कष्टातून यश मिळवलेली कर्तुत्ववान लेक” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here