
युवकाची कापूस उपटण्याच्या चिमट्याने व दगडाने ठेचून हत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
बीड : पूर्व वैमनस्यातून एका युवकाची कापूस उपटण्याच्या चिमट्याने व दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्रकार ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडला आहे. या हत्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिरसाळा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कान्नापूर (ता.धारुर) येथील रहिवासी असलेल्या स्वप्निल उर्फ बबल्या देशमुख या युवकाची एका शेतामध्ये हत्या झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मृत स्वप्निल उर्फ बबल्या देशमुख यांच्या वडिलांनी सिरसाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून आपल्या मुलाला आरोपी संतोष देशमुख व अन्य लोकांनी कापसाच्या काढणी वेळी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याने डोक्यात मारून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी आरोपी 1) संतोष अशोक देशमुख याने व त्याची पत्नी 2) सोनाली संतोष देशमुख 3) रामभाऊ बापुराव देशमुख 4) शाम रामभाऊ देशमुख 5) अक्षय रामभाऊ देशमुख 6) राजेभाऊ विठ्ठलराव देशमुख 7) गोदावरी राजेभाऊ देशमुख व इतर तीन (सर्व रा. कान्नापूर, ता.धारुर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी क्रं. 1) संतोष अशोक देशमुख याने कापूस काढण्याच्या चिमट्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
आरोपी क्रमांक 2 ते 7 यांनी स्वप्नील याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून जिवे ठार मारले. मुलगा स्वप्नील उर्फ बबल्या रामकिसन देशमुख (वय 27, रा. कान्नापूर, ता. धारुर) यास तो एकटा पाहून जुण्या भांडणाचा राग मनात धरुन माझा मुलगा शेतात असताना त्याच्या डोक्यात कापूस काढण्याच्या चिमट्याने व दगडाने मारुन त्याचा खून केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.