“आई-बाबा माफ करा…” स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0
595

महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि कारभार सध्या देशभरात चर्चेचा विषय झालाय. दिल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सध्या चर्चेत आलीये. अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने 21 जुलैला फाशी घेत आत्महत्या केली आहेय. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकलाय. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक निवडणुकीवर प्रकाश टाकलाय.

अंजली अनिल गोपनारायण तिनं‌ काही दिवसांपूर्वी बनवलेली ही रील दिवा असलेली अधिकाऱ्याची गाडी हे तिचं स्वप्न होतंय… अंजली ही अकोल्यातील गंगानगर भागात राहतेय. पोलीस शिपाई असलेल्या वडिलांची मुलगी असणाऱ्या अंजलीनं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्नं‌ पाहत दोन वर्षांपूर्वी दिल्ली गाठलीय… अधिकारी बनल्यानंतर अंबर दिव्याची गाडी घेऊन घरी यावं असं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतंय. मात्र, 23 जुलैला ॲम्बुलन्स गाडीतून आलेला मृतदेहच तिच्या कुटुंबीयांना पहावा लागलाय.

भाड्याच्या खोलीत घेतली फाशी
21 जुलैला अंजलीने दिल्लीतील राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केलीय. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव, सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून जीवन संपवलंय. आपल्या काळजाच्या तुकड्यांनं असा निर्णय घेतल्याने तिच्या कुटुंबियांची सर्व स्वप्न पार विरुन‌ गेली आहेत.

अंजलीच्या ‘सुसाईड नोट’मध्ये तिने नेमकं काय लिहिलंय?
सुसाइड नोटमधून स्पष्ट होते की, त्या विद्यार्थिनीला किती मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत होता. तिने आपल्या नोटमध्ये लिहिले की पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की तिने खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचं एकच स्वप्न होता की, ती पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे, ज्यांनी तिला समर्थन दिले, पण तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे.

हॉस्टेलचे भाडे अव्वाच्यासव्वा
सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही. तिने असेही लिहिले आहे की पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणं आवश्यक आहेय. मात्र, दिल्लीत अलिकडे या विद्यार्थ्यांसंदर्भात घडलेल्या घटना या विद्यार्थ्यांसाठी अन सरकारसाठी अतिशय दुर्दैवी आहेय. या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचं भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा.