देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसचा अपघात ;ट्रकच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू तर २०हून जखमी

0
3

हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक जखमी झाले आहे. मिनी बसमधील प्रवाशी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मंदिरात जात होते. हा अपघात शुक्रवारी पहाटे झाला. अपघातानंतर रस्त्यावर खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. हा अपघात अंबाला दिल्ली जम्मू राष्ट्रीय महामार्गावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, यात सात जणांचा मृत्यू झाला. अपघातात मिनी बसचा अक्षरश: चुराडा झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल होतात, बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. पोलिसांनी काही वेळातच वाहतुक सेवा सुरळीत केली. या अपघाताबावत पोलिस पुढील तपासणी करत आहे. पोलिसांनी अपघातस्थळावरून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.