माणदेश एक्सप्रेस न्युज : सातारा: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण गरम आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. मी जात पात मनात नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण द्यावे अशी भूमिका त्यांनी मांडली.
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणा बाबत प्रा. लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले असून या शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अुतल सावे, आम. गोपीचंद पडळकर यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मनधरणी करणार आहेत.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे काय म्हणाले.
फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रमध्ये असा जातीयवाद होणे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे. जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी भूमिका घेताना राजकीय विद्वेष होऊ नये, याची भूमिका घेणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे भूमिका घ्यायचे तशी भूमिका पंकजा मुंडे घेतात का हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले भोगायला भेटले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.