Helthy Tips : कारल्याची पाने खाण्याची अनेक फायदे; वाचून व्हाल थक्क…

0
43

Karela Leaves Health : कारले असंख्य आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे; परंतु त्याची पानं पोषक घटकांचा एक उत्कृष्ट खजिना आहेत. अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण असलेली कारल्याची पाने विविध उपायांसाठी वापरली जातात आणि आता आधुनिक आहारातही ती त्याच्या संभाव्य भूमिकेसाठी लक्ष वेधून घेत आहेत.
“कारल्याची पानं अ व क जीवनसत्त्वं, तसेच फोलेट, पोटॅशियम व लोह यांसारख्या खनिजांसह आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असतात.”

 

 

या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.ही पानं रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.मधुमेह व्यवस्थापनात साह्य करतात.उच्च फायबर सामग्री पचनास उपयुक्त ठरून, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करतात.ही पानं क जीवनसत्त्वानं समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मग साहजिकच संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते.

 

 

 

त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढून आणि कोलेजन उत्पादनास समर्थन देऊन, निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात.त्यात कॅलरीज कमी; पण फायबर जास्त असल्यामुळे तृप्ती वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.यकृताच्या कार्याला चालना मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत झाल्यामुळे एकूण आरोग्य सुधारते.

 

 

 

“आहारात कारल्याच्या पानांचा समावेश करताना, विशेषतः मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अनेक खबरदारी घेणं आवश्यक आहे. प्रथम, मधुमेह असलेल्यांनी रक्तातील साखरेच्या पातळीचं बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे. कारण- कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, ज्यामुळे मधुमेहाच्या औषधांसह घेतल्यास हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते.”

 

 

 

काही पदार्थांसह कारल्याची पाने रोजच्या जेवणात सहजपणे सहभागी करता येतात. जसे कि चिरलेली कारल्याची पानं कांदा, लसूण व मसाल्यांसह परतून भात किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे ही पानं सूपमध्ये मिसळून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे पौष्टिकता वाढून, एक वेगळी चव येते.

 

 

“तुम्ही केळी किंवा सफरचंद यांसारख्या फळांच्या स्मूदीमध्येही कारल्याची पानं मिसळून त्यांचा कडूपणा लपवू शकता आणि आरोग्यदायी फायदे वाढवू शकता. तसेच मीठ आणि मसाल्यांनी मळलेले पानांचे पातळ काप भाजून किंवा एअर-फ्राय करून, तुम्ही कुरकुरीत नाश्त्यासाठी कारल्याच्या पानांचे चिप्सही बनवू शकता.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here