मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 7 दिवसांनी उपोषण मागे घेतले; सरकारला दिला एक महिन्यांचा अल्टिमेटम

0
6

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 7 दिवसांनी उपोषण मागे घेतले आहे. उपोषण सोडताना त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. सरकारने दगाबाजी केल्यास विधासभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मंत्री शंभुराज देसाईआणि संदीपान भुमरेयांनी ज्युस पाजून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवले.

बुधवारी रात्री उशीरा बीडचे खासदार बजरंग सोनावणे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरेयांनी जरांगे पाटलींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असून त्यासाठी काही कालावधी लागेल. त्यामुळे उपोषण स्थगित करावे असे दोन्ही नेत्यांनी म्हटले. त्यानंतर शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्युस पाजून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले.

मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून सरकारला 1 महिन्यांचा अवधी दिला आहे. तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उभारणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी केली. जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.