‘माणगंगा’ सभासदांचा पाहिजे, सुतगिरणीतील घोटाळ्याची चौकशी करा

0
710

आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील माणगंगा सहकारी कारखाना हा सभासदांचा आहे तो सभासदांचाच राहीला पाहिजे, तर आटपाडी सूतगिरणीमधील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे केली आहे. मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले.

 

 

 

आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या घामाने उभा राहिलेला आहे. मात्र, आता हा कारखाना बंद पाडत, लिलाव प्रक्रियेतून खासगी लोकांच्या घशात घालण्याचा डाव आहे. शेतकऱ्यांचा हक्क असलेला हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत लबाडांच्या घशात जाऊ नये, माणगंगा सहकारी कारखाना हा सभासदांचा आहे तो सभासदांचाच राहीला पाहिजे.

 

 

 

तर आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीला कागदोपत्री तोट्यात दाखवून, काही लालची लोकांनी ती गिळंकृत करण्याचा घाणेरडा डाव आखला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा उघडपणे सुरू आहे, याची तत्काळ चौकशी झाली पाहिजे.

 

 

 

सहकारी संस्थांना लुबाडणाऱ्या भांडवलशाही प्रवृत्तीचा पर्दाफाश करावा. बेकायदेशीर व्यवहार रद्द करून जबाबदारांवर कारवाई करावी शेतकऱ्यांच्या आणि सूतगिरणीच्या हितासाठी तातडीने न्याय मिळावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि बेकायदेशीर व्यवहार त्वरित रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here