
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे, आमच्या वडिलांना अरेरावी का करतोस आणि तू आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेले असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादी बिभीषण महादेव शिरकांडे (वय 52) यांनी दिलेल्या फिर्यादी हे राजेवाडी येथील राज हॉटेल समोर थांबले असताना यातील आरोपी अमोल किसन शिरकांडे व गणेश किसन शिरकांडे हे त्यांची स्विफ्ट गाडीमधून येवून फिर्यादीस तू आमच्या वडिलांना अरेरावी का करतोस आणि तू आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेले असे म्हणून शिवीगाळ करून लाकडी बॅटने फिर्यादीचे पाठीवर व गुडघ्यावर मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचा मोबाईल फोडून देखील आरोपींना फोडून टाकला.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी, अमोल किसन शिरकांडे व गणेश किसन शिरकांडे यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.