महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय; ओला दुष्काळ नसतानाही शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर होणार

0
259

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने कॅन्सर सेवा पॉलिसी तयार केली आहे. या पॉलिसी अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर उपचार उपलब्ध असतील, जेणेकरून नागरिकांना महत्त्वाच्या कॅन्सर ट्रीटमेंट सुविधा मिळू शकतील.


मुख्यमंत्र्यांच्या मते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे मूल्यांकनदेखील करण्यात आले. मागील काही महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर शेतीवर नुकसान झाले आहे. यापैकी ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयांचे आर्थिक वितरण सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी केवायसीची अट शिथिल केली असून मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.


मुख्यमंत्री म्हणाले, “पुढच्या दोन-तीन दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे असेसमेंट करणे कठीण झाले होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन खारपून गेली आहे, घर आणि विहिरी नुकसानग्रस्त झाली आहेत. या सर्व घटकांचा समावेश करून पुढच्या आठवड्यात सर्वसमावेशक पॉलिसी तयार करून घोषणा केली जाईल. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत त्यांच्या खात्यात मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”


ओला दुष्काळाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, “मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, त्यामुळे आतापर्यंत कधीही जाहीर केलेला नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा अर्थ म्हणजे त्यावेळी लागू होणाऱ्या सवलती, उपाययोजना लागू करणे. यावेळीही त्या प्रकारच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यात मी, शिंदे साहेब आणि अजितदादा बसून सर्व प्रकारच्या निर्णयांची घोषणा करणार आहोत.”


  • राज्यात कॅन्सर केअर पॉलिसी लागू केली जात आहे.

  • 60 लाख हेक्टर शेतीवर अतिवृष्टीमुळे नुकसान, राज्य सरकारने 2215 कोटी रुपयांची मदत सुरु केली.

  • केवायसी अट शिथिल केली, मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळवण्याचा प्रयत्न.

  • ओला दुष्काळ जाहीर नाही, पण दुष्काळी सवलती लागू करणार.

  • पुढील आठवड्यात निर्णय आणि घोषणा होणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here