पहिल्या पावसाने महाबळेश्वर धुक्याच्या चादरीत न्हालं; पर्यटकांचा उत्साह शिगेला

0
44

माणदेश एक्सप्रेस न्युज

सातारा : महाबळेश्वरमध्ये वर्षातील पहिला पाऊस कोसळला आणि संपूर्ण परिसरात धुक्याची जणू शुभ्र चादर पसरली. निसर्गातील या बदलाने महाबळेश्वरचा सौंदर्य खुलेल, तसं वातावरण तयार झालं आहे. हवामान आल्हाददायक होतं. यामुळे हिरवागार निसर्ग उजळून निघाला आणि सर्वत्र धुक्याचं मनोहारी दृश्य पाहायला मिळालं.

 

 

शाळांना सुट्ट्या असल्याने लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरला आले आहेत. पावसात भिजत, धुक्याने झाकलेल्या निसर्गाचा पर्यटकांनी मनमुराद आनंद घेतला. दिवसभर वेगवेगळ्या पॉइंट्सला भेट दिल्यानंतर संध्याकाळी पर्यटकांची पावले वेण्णा लेककडे वळत आहेत. येथे बोटिंग, घोडेस्वारी आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेत पर्यटक रमले आहेत.

 

 

बाजारपेठांमध्येही सायंकाळपासून गर्दी वाढत आहे. या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांचे चेहरे खुलले आहेत. पावसानंतर वातावरणात थोडीशी थंडी जाणवू लागली असून संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुक्याची धुंदी अनुभवायला मिळत आहे. एकूणच, पहिल्या पावसामुळे महाबळेश्वर फुलून आलं आहे आणि पर्यटकांसाठी ही सहल संस्मरणीय ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here