नोकरी शोधताय! तर मग बँकेत नोकरीची सुवर्णसंधी अर्ज कुठे आणि कसा करावा…

0
480

माणदेश एक्सप्रेस न्युज : 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल हाउसिंग बँकेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

नॅशनल हाउसिंग बँकेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट www.nhb.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. मुदतीनंतर या नोकरीसाठी कोणीही अर्ज करु नये.

या नोकरीसाठी २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ६३,८४० ते ७८,२३० रुपये वेतन मिळणार आहे.
या नोकरीसाठी MMG स्केल III, MMG स्केल II पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण १९ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

नॅशनल हाउसिंग बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत एमबीए/सीएफए / आयसीएआय / आयसीडब्ल्यूएआय पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.डेटा सायंटिस्टस / कम्प्युटिंग अँड स्टॅस्टिस्टिक्स पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावेत.