क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरची मान उंचावली; कोल्हापूरच्या ७ जणांना क्रीडा पुरस्कार जाहीर

0
47

माणदेश एक्सप्रेस/कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०२३-२४ या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा मंगळवारी झाली. या क्रीडा पुरस्कारावर कोल्हापूर आणि परिसरातील ७ खेळा खेळाडूंनी आपली नावे कोरली आहेत. यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झाला आहे.

 

जिल्ह्यातील ॲथलेटिक्स, रग्बी, वेटलिफ्टिंग, सॉफ्ट बॉल आणि कुस्ती या खेळ प्रकारातील खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांनी केला आहे. या पुरस्कारांनी क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरची मान आणखी उंचावली.पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.

 

विविध खेळ प्रकारातील कोल्हापूरच्या खेळाडूंचे कौशल्य आणि विविध पातळीवरील दमदार कामगिरीचा गौरव महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांनी केला आहे. या पुरस्कारावर कोल्हापुरच्या ७ खेळाडूंनी आपले नाव कोरले आहे. पॅरा जलतरण प्रकारात कोल्हापूरचे मानसिंग यशवंत पाटील यांना दिव्यांग खेळाचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ॲथलेटिक्समध्ये किरण पांडुरंग भोसले, रग्बीमध्ये श्रीमती कल्याणी पाटील आणि पृथ्वीराज बाजीराव पाटील, वेटलिफ्टिंगमध्ये अभिषेक सुरेश निपाणी, कुस्तीमध्ये सृष्टी जयवंत भोसले आणि सॉफ्टबॉलमध्ये ऐश्वर्या पुरी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

गेल्या वर्षी कोल्हापुर जिल्ह्यातील ८ खेळाडूंना पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु त्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते. त्यांना यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहेत. यामधे कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर, रग्बी खेळाडू वैष्णवी दत्तात्रय पाटील, श्रीधर श्रीकांत निगडे, दिव्यांग जलतरणपटू अफ्रीद मुख्तार अत्तार, कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रीय सायकलपटू प्रतीक संजय पाटील, शाहू तुषार मानेला नेमबाजीत, अन्नपूर्णा सुनील कांबळे याला ॲथलेटिक्स, नंदिनी बाजीराव साळोखेला कुस्तीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here