भारतीय सराफा बाजार (Indian Gold Market) नेहमीच चढउतार, तेजी मंदी यांनी भारलेला असतो. त्यात मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सोने धातूची किंमत भारतीय नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे भारतात सोने दर, चांदी दर (Gold Silver Prices in India) हे दररोज तपासले जातात. त्याचा केवळ सराफा बाजारच नव्हे तर सामान्य गुंतवणूकदारांवरही मोठा प्रभाव पडतो. आज (24 सप्टेंबर 2024) बाजार सुरु झाला तेव्हा, भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,360 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्या तुलनेत, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपये होती, जी सामान्यतः त्याच्या मिश्रधातूच्या रचनेमुळे दागिन्यांमध्ये वापरली जाते. भारतीय बाजारात सोन्याचा भाव 92,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. इथे दिलेले, सर्व दर गुडरिटर्न्स वेबसाईट आणि इतर काही नामवंत संकेतस्थळांवरुन घेतले आहेत.
शहरनिहाय सोन्याचे दर (रुपये/10 ग्रॅम) (24 सप्टेंबर 2024)
दिल्ली: 22 कॅरेट सोने दर 70,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,510 रुपये आहे.
मुंबई: 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,360 रुपये आहे.
अहमदाबाद: 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,410 रुपये आहे.
चेन्नई, कोलकाता, भुवनेश्वर आणि हैदराबाद: 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,360 रुपये आहे.
गुरुग्राम, लखनौ आणि जयपूर: 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,150 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,510 रुपये आहे.
पाटणा: 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,410 रुपये आहे.
बंगळुरु: 22 कॅरेट सोन्याचे दर 70,000 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 76,360 रुपये होते.
बाजारातील घसरणीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतींवर परिणाम
भारतातील सोन्याची किरकोळ किंमत जागतिक आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय घटक आणि पुरवठा आणि मागणीतील बदलांच्या आधारे बदलते. भारतीय संस्कृतीत महत्त्वाची गुंतवणूक असलेल्या सोन्याला विवाहसोहळा आणि सणांमध्ये विशेष स्थान आहे, ज्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी ती एक महत्त्वाची वस्तू बनते. (हेही वाचा, Madhya Pradesh Crime: गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी चोरली सोन्याची चैन, घटना सीसीटीव्हीत कैद)
दरम्यान, इथे दिलेले सोने आणि चांदी दर हे कोणत्याही करांशिवाय देण्यात आले आहेत. त्यामध्ये वस्तू सेवा कर (GST), स्थानिक कर किवा इतर काही शुल्क समाविष्ठ केले तर त्याचे दर बदलू शकतात. त्यामुळे आपल्याला सोने, चांदी गुंतवणूक दर जाणून घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही सोनार अथवा ज्वेलर्सा आपण भेट देऊ शकता. किंवा अधिकृत संकेतस्थळांवरुनही तुम्हाला त्याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकते.