जाणून घ्या ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँक राहतील बंद, कामाचे अगोदरच करा नियोजन

0
162

ऑगस्ट महिन्यात विविध सण येतात. या महिन्यांत स्वातंत्र्य दिनासह अनेक उत्सव ही साजरे होतात. 15 ऑगस्टसह या महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. तर विविध सणांमुळे बँकांना पण ताळे असेल. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन तर 26 ऑगस्टला जन्माष्टमीच्या निमित्ताने बँकाचे कामकाज बंद असेल. ऑगस्ट महिन्यात या दिवशी सुट्यांचा मुक्काम असेल.

राज्यानुसार सुट्ट्या

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List 2024) बँकिंगच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केल्या जाणाऱ्या सणांच्या किंवा संबंधित राज्यांमध्ये खास प्रयोजनानुसार सुट्टी जाहीर करण्यात येते.

ऑगस्ट महिन्यात या दिवशी बँकांना ताळे

3 ऑगस्ट : केर पूजा (आगरतळा)

4 ऑगस्ट : रविवारची सुट्टी

8 ऑगस्ट : तेंडोंग लो रम फातनिमित्त सुट्टी (गंगटोक)

10 ऑगस्ट : दुसरा शनिवार

11 ऑगस्ट : रविवार

13 ऑगस्ट : इंफाळमध्ये बँक बंद

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

18 ऑगस्ट : रविवार

19 ऑगस्ट : रक्षाबंधन

20 ऑगस्ट : श्री नारायण गुरु जयंती

25 ऑगस्ट : रविवार

26 ऑगस्ट : जन्माष्टमी

31 ऑगस्ट : चौथा शनिवार

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

सुट्यांचे गणित काय

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.